भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाई गोपाळ यमुनेचे तटी । येती पाणिया मिळोनी जगजेठी । चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी । चला चला म्हणती पाहू दृष्टी वो

gai gopal yamuneche tati | yeti paniya miloni jagajethi | chendu chauguna khelati valavanti | chala chala mhanati pahu drushti vo

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गाई गोपाळ यमुनेचे तटी । येती पाणिया मिळोनी जगजेठी । चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी । चला चला म्हणती पाहू दृष्टी वो ॥१॥ ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ ते देखाव्य हरी । मिस पाणियाचे करितील घरी । बारा सोळा मिळोनी परस्परी वो ॥ध्रु.॥ चिरें चोळीया त्या धुतां विसरती । ऊर्ध्व लक्ष लागलें कृष्ण मूर्ती । कोणां नाठवे हा कोण कुळ याती । झाल्या तटस्थ सकळां नेत्रा पातीं वो ॥२॥ दंत धावनाचा मुख माजी हात । वाद्यें वाजती नाईके जनमात । करी श्रवण श्रीकृष्णवेणूगीत । स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ वो ॥३॥