भजनी मालिका
← भजनांकडे परत

गडियासी सांगे वैकुंठीचा राव । आजीं आला भेवो यमुनेंत

gadiyasi sange vaikunthicha rav | ajin ala bhevo yamunent

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गडियासी सांगे वैकुंठीचा राव । आजीं आला भेवो यमुनेंत ॥१॥ जीवनालागीं तेथें कोण्ही पै न जावें । बाऊ आला आहे तया ठायीं ॥२॥ तयांचे बालेणें लागे सर्वा गोड । म्हणोनि धरिती चाड संवगडे ॥३॥ एका जनार्दनींऐकोनि वचन । पढती वचन पेंदा बोले ॥४॥