भजनी मालिका
← भजनांकडे परत

गडियांचे उत्तर ऐकोनी सांवळा वेधियलें मन तटस्थ सकळां

gadiyanche uttar aikoni sanvala vedhiyalen man tatastha sakalan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गडियांचे उत्तर ऐकोनी सांवळा वेधियलें मन तटस्थ सकळां ॥१॥ घेउनी मोहरीं गाई पाचारी सकळां । नवल तें जाहलें गोपाळा सकळां ॥२॥ नको वेरझारा पुरे आतां हरी । एका जनार्दनीं ऐशी करुना करी ॥३॥ एका जनार्दनी विश्वांचा निवासी । गाई आणि गोपाळां वेधिला सर्वासी ॥४॥