भजनी मालिका
← भजनांकडे परत

गडी मिळाले सकळ । यमुनेतटीं खेळ खेळती

gadi milale sakal | yamunetatin khel khelati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गडी मिळाले सकळ । यमुनेतटीं खेळ खेळती ॥१॥ धांवती ते सैरावैरा । खेळ बरा म्हणती ॥२॥ विसरलें तहान भुक । देखोनी कौतुक खेळांचे ॥३॥ भुललें संवगडी देखोनी । एका जनार्दनीं म्हणतसे ॥४॥