भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाढवाचें तानें । पालटते क्षणक्षणें

gadhavachen tanen | palatate kshanakshanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गाढवाचें तानें । पालटते क्षणक्षणें ॥१॥ तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ध्रु.॥ उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥२॥ तुका म्हणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥३॥