भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाढव शृंगारिलें कोडें । कांहीं केल्या नव्हे घोडें

gadhav shrungarilen koden | kanhin kelya navhe ghoden

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गाढव शृंगारिलें कोडें । कांहीं केल्या नव्हे घोडें ॥१॥ त्याचें भुंकणें न राहे । स्वभावासी करील काय ॥ध्रु.॥ श्वान शिबिके बैसविलें । भुंकतां न राहे उगलें ॥२॥ तुका म्हणे स्वभावकर्म । कांहीं केल्या न सुटे धर्म ॥३॥