भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकी पुढें एक सांगतीं गार्‍हणीं । लिहितां पृथ्वीं न पुरेचि धूणी

eki pudhen ek sangatin gar‍hanin | lihitan pruthvin na purechi dhuni

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकी पुढें एक सांगतीं गार्‍हणीं । लिहितां पृथ्वीं न पुरेचि धूणी ॥१॥ म्हणे यशोदा कृष्णा काय हें कैसें । खोडी नको करुं हरि बोलतसे ॥२॥ मज नेती गृहांत दहा पांच मिळती । नग्न होऊनियां मज पुढें नाचती ॥३॥ म्हणती रे पोरा तु दिससी साना । हृदयी धरुनी करी देती स्तना ॥४॥ ऐसे यांचे तुज सांगु म्हनतां माते । एका जनार्दनी नवल वाटे तुंते ॥५॥