भजनी मालिका
← भजनांकडे परत

एके ठायीं अन्नपाणी । ग्रासोग्रासीं चिंतनीं

eke thayin annapani | grasograsin chintanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एके ठायीं अन्नपाणी । ग्रासोग्रासीं चिंतनीं ॥१॥ वेळोवेळां जागवितों । दुजें येईल म्हणु भीतों ॥ध्रु.॥ नाहीं हीं गुंतत उपचारीं । मानदंभाचे वेव्हारीं ॥२॥ तुका झालासे शाहाणा । आड लपे नारायणा ॥३॥