भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकवेळ करीं या दुःखावेगळें । दुरिताचें जाळें उगवूनि

ekavel karin ya duhkhavegalen | duritachen jalen ugavuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एकवेळ करीं या दुःखावेगळें । दुरिताचें जाळें उगवूनि ॥१॥ आठवीन पाय हा माझा नवस । रात्री ही दिवस पांडुरंगा ॥ध्रु.॥ बहु दूरवरी भोगविले भोगा । आतां पांडुरंगा सोडवावें ॥२॥ तुका म्हणे काया करीन कुरवंडी । ओंवाळूनि सांडीं मस्तक हें ॥३॥