भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकाएकीं आतां असावेंसें वाटे । तरि च हे खोटे चाळे केले

ekaekin atan asavensen vate | tari cha he khote chale kele

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एकाएकीं आतां असावेंसें वाटे । तरि च हे खोटे चाळे केले ॥१॥ वाजवूनि तोंड घातलों बाहेरी । कुल्प करुनी दारीं माजी वसा ॥ध्रु.॥ उजेडाचा केला दाटोनि अंधार । सवें हुद्देदार चेष्टाविला ॥२॥ तुका म्हणे भय होतें तों चि वरी । होती कांहीं उरी स्वामिसेवा ॥३॥