भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं

eka purusha doghi nari | pap vase tyache gharin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥१॥ पाप न लगे धुंडावें । लागेल तेणें तेथें जावें ॥ध्रु.॥ कांहीं दुसरा विचार । न लगे करावा चि फार ॥२॥ असत्य जे वाणी । तेथें पापाची च खाणी ॥३॥ सत्य बोले मुखें । तेथें उचंबळती सुखें ॥४॥ तुका म्हणे दोन्ही । जवळी च लाभहानी ॥५॥