भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका नामासाठी । प्रगटतसे कोरडे काष्ठीं । भक्तवचनाची आवडी मोठीं । होय जगजेठी अंकित

eka namasathi | pragatatase korade kashthin | bhaktavachanachi avadi mothin | hoy jagajethi ankit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एका नामासाठी । प्रगटतसे कोरडे काष्ठीं । भक्तवचनाची आवडी मोठीं । होय जगजेठी अंकित ॥१॥ एका घरीं उच्छिष्ट काढणें । एका द्वारी द्वारपाळपण करणें । एका घरीं गुरें राखणें । लोणी खाणें चोरुनी ॥२॥ एकाचि उगेचि धरुनि आस । उभा राहे युगें अठ्ठावीस । एका जनार्दनीं त्याचा दास । नामें आपुल्या अंकित ॥३॥