भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका हातीं टाळ एका हातीं चिपिळया । घालिती हुंमरी एक वाहाताती टाळिया

eka hatin tal eka hatin chipilaya | ghaliti hummari ek vahatati taliya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एका हातीं टाळ एका हातीं चिपिळया । घालिती हुंमरी एक वाहाताती टाळिया ॥१॥ मातले वैष्णव नटती नाना छंदें । नाहीं चाड मोक्षपदें भजनीं आवडी ॥ध्रु.॥ हाका अरोळिया गीतवादें सुखसोहळे । जाय तें न कळे केव्हां रजनी दिवस ॥२॥ तीर्थी नाहीं चाड न लगे जावें वनांतरा । तुका म्हणे हरीहरात्मक चि पृथिवी ॥३॥