भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका गावें आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां

eka gaven ahmin vithobache nam | anikampen kam nahin atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एका गावें आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥१॥ मोडूनियां वाटा सूक्षम दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ध्रु.॥ लावूनि मृदांग टाळश्रुतिघोष । सेवूं ब्रम्हरस आवडीनें ॥२॥ तुका म्हणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळामात्रें ॥३॥