भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका एक वर्में लावूनियां अंगीं । ठेवितों प्रसंगीं सांभाळीत

eka ek varmen lavuniyan angin | theviton prasangin sambhalit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एका एक वर्में लावूनियां अंगीं । ठेवितों प्रसंगीं सांभाळीत ॥१॥ नेघावा जीं तुम्ही वाव बहु फार । धरूनि अंतर ठायाठाव ॥ध्रु.॥ वेव्हारें आलें तें समानें चि हातें । बळ नाहीं येथें चालों येत ॥२॥ तुका म्हणे आतां निवाडा च साटीं । संवसारें तुटी करुनि ठेलों ॥३॥