भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका बीजा केला नास । मग भोगेल कणीस

eka bija kela nas | mag bhogel kanis

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एका बीजा केला नास । मग भोगेल कणीस ॥१॥ कळे सकळां हा भाव । लाहानथोरांवरी जीव ॥ध्रु.॥ लाभ नाहीं फुकासाठीं । केल्यावीण जीवासाठीं ॥२॥ तुका म्हणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥३॥