भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक तटस्थ मानसीं । एक सहज चि आळसी

ek tatastha manasin | ek sahaj chi alasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एक तटस्थ मानसीं । एक सहज चि आळसी ॥१॥ दोन्ही दिसती सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ॥ध्रु.॥ एक ध्यानीं करिती जप । एक बैसुनि घेती झोप ॥२॥ एकां सर्वस्वाचा त्याग। एकां पोटासाठीं जोग ॥३॥ एकां भक्ति पोटासाठीं । एकां देवासवें गांठी ॥४॥ वर्म पोटीं एका । फळें दोन सांगेतुका ॥५॥