भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक कीर्तन करितां पंढरीसी । सुकृताच्या राशी ब्रह्मा नेणें

ek kirtan karitan pandharisi | sukrutachya rashi brahma nenen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक कीर्तन करितां पंढरीसी । सुकृताच्या राशी ब्रह्मा नेणें ॥१॥ संतसमागम टाळ घोळ नाद । ऐकतां गोविंद सुख पावे ॥२॥ जनार्दनाचा एक करी विनवणी । मस्तक चरणीं ठेवितसे ॥३॥