भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक करिती गुरु गुरु । भोंवता भारु शिष्यांचा

ek kariti guru guru | bhonvata bharu shishyancha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एक करिती गुरु गुरु । भोंवता भारु शिष्यांचा ॥१॥ पुंस नाहीं पाय चारी । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ध्रु.॥ परस्त्री मद्यपान। पेंडखान माजविलें ॥२॥ तुका म्हणे निर्भर चित्तीं । अधोगती जावया ॥३॥