भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक एका साह्य करूं । अवघें धरूं सुपंथ

ek eka sahya karun | avaghen dharun supanth

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एक एका साह्य करूं । अवघें धरूं सुपंथ ॥१॥ कोण जाणे कैसी परी । पुढें उरी ठेवितां ॥ध्रु.॥ अवघे धन्य होऊं आता । स्मरवितां स्मरण ॥२॥ तुका म्हणे अवघी जोडी । ते आवडी चरणांची ॥३॥