भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक एक मरती पहाती । दुजियासी भ्रांति कैशी बापा

ek ek marati pahati | dujiyasi bhranti kaishi bapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक एक मरती पहाती । दुजियासी भ्रांति कैशी बापा ॥१॥ अरे ग्रासिलें शरीर काळे देखा । परि तया मूर्खा न कळे कांहीं ॥२॥ एका जनार्दनीं भुलला प्रपंचा । कोण दुःखा त्याच्या सोडवील ॥३॥