भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक एक मंत्र करिती अनुष्ठान । परि विठोबाचे चरण दुर्लभ ते

ek ek mantra kariti anushthan | pari vithobache charan durlabh te

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक एक मंत्र करिती अनुष्ठान । परि विठोबाचे चरण दुर्लभ ते ॥१॥ एक एक तीर्था करिती प्रदक्षिणा । परि विठोबाचे चरण दुर्लभ ते ॥२॥ एक एक ग्रामी करिती भ्रमण । परि विठोबाचे प्राप्ती दुर्लभ ते ॥३॥ एका जनार्दनीं सत्संगावांचुनीं । परि विठोबाची मिळणी दुर्लभ ते ॥४॥