भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक आहे मज आस । संत दासाचा मी दास

ek ahe maj as | sant dasacha mi das

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक आहे मज आस । संत दासाचा मी दास ॥१॥ कै पुराती मनोरथ । संत सनाथ करतील ॥२॥ मनींचें साच होईल कोई । क्षेम मी देई संतांची ॥३॥ शरण एका जनार्दनीं । माझा मनीं नवस पुरे ॥४॥