भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्याल माळ जरी पडेन मी पायां । दंडवत वांयां कोण वेची

dyal mal jari paden mi payan | dandavat vanyan kon vechi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
द्याल माळ जरी पडेन मी पायां । दंडवत वांयां कोण वेची ॥१॥ आलें तें हिशोबें अवघिया प्रमाण । द्यावें तरी दान मान होतो ॥ध्रु.॥ मोकळिया मनें घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥२॥ तुका म्हणे तुम्ही जालिया कृपण । नामाची जतन मग कैची ॥३॥