भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वारकेमाजीं श्रीकृष्ण । एकदा करी देवार्चन । उद्धवें कर जोडोन । केला प्रश्न श्रीकृष्णा

dvarakemajin shrikrushna | ekada kari devarchan | uddhaven kar jodon | kela prashna shrikrushna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
द्वारकेमाजीं श्रीकृष्ण । एकदा करी देवार्चन । उद्धवें कर जोडोन । केला प्रश्न श्रीकृष्णा ॥१॥ सर्व देवाचा तुं देव । ईश्वर न कळे तुझी माव । शिवणे सर्व ऋषी गणगंधर्व । परी तुं नाकळा सर्वथा ॥२॥ तुम्हीं बैसोनि एकांतीं । काय करितां श्रीपती । हें होतें पुसणें माझे चित्तीं बहु दिवस श्रीहरीं ॥३॥ एकोनी उद्धवाची मात । तया बोले जगन्नाथ । एका जनार्दनीं विनवीत । सावधान परियेसा ॥४॥