भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वारकेहुनी विठु पंढरीये आला । नामयाचा पूर्वज दामशेटी वहिला

dvarakehuni vithu pandhariye ala | namayacha purvaj damasheti vahila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
द्वारकेहुनी विठु पंढरीये आला । नामयाचा पूर्वज दामशेटी वहिला ॥१॥ दामा आणि गोणाई नवसी विठूसी । पुत्र देईं आम्हां देवा भक्तराशी ॥२॥ तोचि नामदेव जन्म शिंपियाचे कुळीं । भक्तातें पाहुनी वेधला वनमाळी ॥३॥ एका जनार्दनीं परंपरा कथियेली । धन्य धन्य विठु अनाथाची माउली ॥४॥