भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वापरी अवतार आठवा । कंसासुर वधियला श्रीकृष्ण साठवा

dvapari avatar athava | kansasur vadhiyala shrikrushna sathava

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
द्वापरी अवतार आठवा । कंसासुर वधियला श्रीकृष्ण साठवा ॥१॥ तो़चि महाराज चंद्रभागेतटीं । उभा राहिलासे कर ठेऊनि कटीं ॥२॥ एका जनार्दनीं चरणीं पडली मिठी । आठवा आठवितां तुटे जन्मकोटी ॥३॥