भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण

durjanacha man | sukhen karava khandan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥१॥ लाता हाणोनियां वारी । गुंड वाट शुद्ध करी ॥ध्रु.॥ बहुतां पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥२॥ तुका म्हणे नखें । काढुनि टाकिजेती सुखें ॥३॥