भजनी मालिका
← भजनांकडे परत

दूरि तों चि होतों आपुले आशंके । नव्हतें ठाउकें मूळ भेद

duri ton chi hoton apule ashanke | navhaten thauken mul bhed

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दूरि तों चि होतों आपुले आशंके । नव्हतें ठाउकें मूळ भेद ॥१॥ आतां जेथें तेथें येइन सांगातें । लपाया पुरतें उरों नेदीं ॥ध्रु.॥ मिथ्या मोहो मज लाविला उशीर । तरी हे अंतर झालें होतें ॥२॥ तुका म्हणे कां रे दाखविसी भिन्न । लटिका चि सीण लपंडाई ॥३॥