भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्रव्य घेऊनियां उपदेश देती । मार्जार ते होती जन्मोजन्मीं

dravya gheuniyan upadesh deti | marjar te hoti janmojanmin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
द्रव्य घेऊनियां उपदेश देती । मार्जार ते होती जन्मोजन्मीं ॥१॥ द्रव्य घेऊनियां तीर्थयात्रा करिती । श्वान ते होती जन्मोजन्मीं ॥२॥ द्रव्य देऊनियां दान परतोनि घेती । सूकार ते होती जन्मोजन्मी ॥३॥ द्रव्य घेऊनियां रंगी जें नाचती । वैष्णव ते न होती जन्मोजन्मीं ॥४॥ एका जनार्दनीं निर्धन भजन । तेथें नारायण संतुष्टची ॥५॥