भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्रव्य घेऊनियां कथा जे करिती । उभयतां जाती नरकामध्यें

dravya gheuniyan katha je kariti | ubhayatan jati narakamadhyen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
द्रव्य घेऊनियां कथा जे करिती । उभयतां जाती नरकामध्यें ॥१॥ तयांचियां दोषां नाहीं परिहार । वेदाचा विचार कुंठितची ॥२॥ शास्त्रांची तो मती न चाले सर्वथा । पुराणे हो तत्त्वता मौनावलीं ॥३॥ एका जनार्दनीं दोषां नाहीं पार । रवरव निर्धारें भोगिताती ॥४॥