भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोळ्यामध्यें जैसें कणु । अणु तें हि न समाये

dolyamadhyen jaisen kanu | anu ten hi na samaye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
डोळ्यामध्यें जैसें कणु । अणु तें हि न समाये ॥१॥ तैसें शुद्ध करा हित । नका चित्त बाटवूं ॥ध्रु.॥ आपल्याचा कळवळा। आणिका बाळावरी न ये ॥२॥ तुका म्हणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या ॥३॥