भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे

dnyaniyanche gharin chojavitan dev | tethen ahambhav pathi lage

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्ञानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे ॥१॥ म्हणोनियां अवघे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥ध्रु.॥ वेदपारायण पंडित वाचक । न मिळती एक एकांमधीं ॥२॥ पाहों गेलों भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथें देखें चेष्टा विपरीत ॥३॥ आपुलिया नाहीं निवाले जे अंगें । योगी करती रागें गुरगुरु ॥४॥ तुका म्हणे मज कोणांचा पांगिला । नको बा विठ्ठला करूं आतां ॥५॥