भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां

dnyaniyancha guru raja maharav | mhanati dnyanadev aisen tumhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां ॥१॥ मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ॥ध्रु.॥ ब्रह्मादिक जेथें तुम्हां वोळगणे । इतर तुळणें काय पुढे ॥२॥ तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोलीं । म्हणोनि ठेविली पायीं डोई ॥३॥