भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानाचें जें अधिष्ठान । महादेव एकचि जाण

dnyanachen jen adhishthan | mahadev ekachi jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्ञानाचें जें अधिष्ठान । महादेव एकचि जाण ॥१॥ कर्म उपासना साधन । पैं शिवचि अधिष्ठान ॥२॥ तेथुनी प्राप्त सर्व देवां । मुखीं शंकर वदावा ॥३॥ याकारणें शिवशक्ति । जनहो करा दिनरात्रीं ॥४॥ एका जनार्दनीं शंकर । पावती भवसिंधु पार ॥५॥