भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिली हाक मनें नव्हे ती जतन । वेगाळले गुणें धांव घेती

dili hak manen navhe ti jatan | vegalale gunen dhanv gheti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दिली हाक मनें नव्हे ती जतन । वेगाळले गुणें धांव घेती ॥१॥ काम क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा द्वेष फार माया तृष्णा ॥ध्रु.॥ इंद्रियांचे भार फिरतील चोर । खाणे घ्यावया घर फोडूं पाहे ॥२॥ माझा येथें कांहीं न चले पराक्रम । आहे त्याचें वर्म तुझे हातीं ॥३॥ तुका म्हणे आतां करितों उपाय । जेणें तुझे पाय आतुडती ॥४॥