भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिली चाले वाचा । क्षय मागिल्या तपाचा

dili chale vacha | kshay magilya tapacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दिली चाले वाचा । क्षय मागिल्या तपाचा ॥१॥ रिद्धि सिद्धि येती घरा । त्याचा करिती पसारा ॥ध्रु.॥ मानदंभांसाटीं। पडे देवासवें तुटी ॥२॥ तुका म्हणे मेवा । कैचा वेठीच्या निर्दैवा ॥३॥