भजनी मालिका
← भजनांकडे परत

ध्वज वज्रांकुश शोभती चरणीं । तो उभा रंगणीं वैष्णवांचें

dhvaj vajrankush shobhati charanin | to ubha ranganin vaishnavanchen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ध्वज वज्रांकुश शोभती चरणीं । तो उभा रंगणीं वैष्णवांचें ॥१॥ झळकतसे हातीं पद्म आणि गदा । पुंडलिक वरदा उभा विटे ॥२॥ चरणीं भागीरथीं गंगा ती शोभली । भक्तांची क्षाळिलीं महात्पापें ॥३॥ एका जनार्दनीं सकळ तीर्थराव । उभा राह प्रभव विटेवरी ॥४॥