भजनी मालिका
← भजनांकडे परत

ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी

dhenkanasi baj gad | utarachadh kevadhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी ॥१॥ होता तैसा कळों भाव । आला वाव अंतरींचा ॥ध्रु.॥ बोरामध्यें वसे अळी। अठोळीच भोंवती ॥२॥ पोटासाटीं वेंची चणे । राजा म्हणे तोंडें मी ॥३॥ बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर ॥४॥ तुका म्हणे ऐसें आहे । काय पाहे त्यांत तें ॥५॥