भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरितां हातीं हात न सुटे चिकाटी । पडली ती मिटाही नोहे कदा सुटी

dharitan hatin hat na sute chikati | padali ti mitahi nohe kada suti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धरितां हातीं हात न सुटे चिकाटी । पडली ती मिटाही नोहे कदा सुटी ॥१॥ वायां काय बळ वेंचितोंसी मुढा । न सुटतां हातीं हात वायां जिनें दगडा ॥२॥ ऐशी मिठी घालीअं एकदां जनार्दन पायीं । न सुटेचि कालन्नयी सर्वत्र देती ग्वाही ॥३॥ कायावाचामनें शरण एका जनार्दनीं । मिठी पडली ते न सुटे भावें चरणीं ॥४॥