भजनी मालिका
← भजनांकडे परत

ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे मी झुंजार कैसा जुंझो

dhalatalavare guntale he kar | mhane mi jhunjar kaisa junjho

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे मी झुंजार कैसा जुंझो ॥१॥ पोटी पडदळ सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥ बैसविलें मला येणें अश्वावरी । धावूं पळूं तरी कैसा आतां ॥२॥ असोनि उपाय म्हणे हे आपण। म्हणे हायहाय काय करूं ॥३॥ तुका म्हणे हा तों स्वयें परब्रम्ह । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥४॥