भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी आवडे भक्तसमागम । त्यांचें सर्व काम करी अंगें

devasi avade bhaktasamagam | tyanchen sarva kam kari angen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवासी आवडे भक्तसमागम । त्यांचें सर्व काम करी अंगें ॥१॥ भक्ताकाजालागीं अवतार धरी । नांदे भक्तांघरीं स्वयें देव ॥२॥ भक्तांविण देवा कांहींचि नावडे । भक्त तो आवडें सर्वकाळ ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । देव सदोदित स्वयें होत ॥४॥