भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचिया वस्त्रा स्वप्नीं ही नाठवी । स्त्रियेसी पाठवी उंच साडी

devachiya vastra svapnin hi nathavi | striyesi pathavi unch sadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाचिया वस्त्रा स्वप्नीं ही नाठवी । स्त्रियेसी पाठवी उंच साडी ॥१॥ गाईचें पाळण नये चि विचारा । अश्वासी खरारा करी अंगें ॥ध्रु.॥ लेकराची गांड स्वयें धांवें क्षाळूं । न म्हणे प्रक्षाळूं द्वीज पाय ॥२॥ तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥