भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं

deva he majhi mirashi | thav tujhya payampashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवा हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥१॥ याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥ देऊनियां जीव। बळी साधिला हा ठाव ॥२॥ तुका म्हणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥३॥