भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा आतां ऐसा करीं उपकार । देहेचा विसर पाडीं मज

deva atan aisa karin upakar | dehecha visar padin maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवा आतां ऐसा करीं उपकार । देहेचा विसर पाडीं मज ॥१॥ तरीं च हा जीव सुख पावे माझा । बरें केशीराजा कळों आलें ॥ध्रु.॥ ठाव देई चित्ता राख पायांपाशीं । सकळ वृत्तींसी अखंडित ॥२॥ असे भय आतां लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा ॥३॥ मागणें तें एक हें चि आहे आतां । नाम मुखीं संतसंग देई ॥४॥ तुका म्हणे नको वरपंग देवा । घेई माझी सेवा भावशुद्ध ॥५॥