भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव पुजिती आपुले भक्ता । मज वाढविलें म्हणे उचिता

dev pujiti apule bhakta | maj vadhavilen mhane uchita

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव पुजिती आपुले भक्ता । मज वाढविलें म्हणे उचिता ॥१॥ ऐसा मानीं उपकार । देव भक्ति केला थोर ॥२॥ देवाअंगीं नाहीं बळ । भक्त भक्तीनें सबळ ॥३॥ देव एक देशीं वसे । भक्त नांदतीं समरसें ॥४॥ भक्तांची देवा आवडी । उणें पडों नेदी अर्ध घडी ॥५॥ नाहीं लाज अभिमान देवा । एका जनार्दनीं करी सेवा ॥६॥