भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव प्रसन्न जाला माग म्हणे वहिला । भक्त घरोघरीं विचार पुसों गेला

dev prasanna jala mag mhane vahila | bhakta gharogharin vichar puson gela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव प्रसन्न जाला माग म्हणे वहिला । भक्त घरोघरीं विचार पुसों गेला ॥१॥ भाव कीं भ्रांति आळस की भक्ती । विचारुनी व्यक्ति ठायीं ठेवा ॥२॥ अरे हें गुह्मा गोप्य कुडे करुं नये उघडे । तरी द्वारोद्वार पुसुं जाय वेडे ॥३॥ विलंब करितां पहा हो उदास जाला देवो । निवालिया खंती न घाली म्हणे घावो ॥४॥ शिकविलें नायकती वरिलें तें करिती । आपुलेनि कर्में आपण गुंतताती ॥५॥ एकाजनार्दनीं शीतळ भाव । आळसाचें देव दुर्‍हाविला ॥६॥