भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव भक्त उभे दोन्हीं एके ठायीं । चला जाऊं पायीं तया गांवा

dev bhakta ubhe donhin eke thayin | chala jaun payin taya ganva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव भक्त उभे दोन्हीं एके ठायीं । चला जाऊं पायीं तया गांवा ॥१॥ आवडीचा हेत पुरेल मनाचा । उच्चारितां वाचा विठ्ठल नाम ॥२॥ करुनियां स्नान पुंडलिकांची भेटी । नाचुं वाळुवंटीं वाहु टाळी ॥३॥ अजाऊ महाद्वारीं पाहुं तो सांवळा । वोवाळुं गोपाळा निबलोण ॥४॥ एका जनार्दनीं मनोरथ पुरे । वासना ते नुरे मांगे कांहीं ॥५॥