भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव आणि भक्त करिती जयजयकार । नाम घोष अंबर गर्जतसे

dev ani bhakta kariti jayajayakar | nam ghosh ambar garjatase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव आणि भक्त करिती जयजयकार । नाम घोष अंबर गर्जतसे ॥१॥ आनंदे वैष्णव हरिकथा करिती । गाती नाचताती प्रेमछंदे ॥२॥ नारद तुंबर भक्त पुंडलिक । वैष्णव आणिक नाम गाती ॥३॥ सोपान आनंदे समाधि बैसला । एका जनार्दनीं केला जयजयकार ॥४॥