भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखोवेखीं करिती गुरू । नाहीं ठाउका विचारु

dekhovekhin kariti guru | nahin thauka vicharu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देखोवेखीं करिती गुरू । नाहीं ठाउका विचारु॥१॥ वर्म तें न पडे ठायीं । पांडुरंगाविण कांहीं ॥ध्रु.॥ शिकों कळा शिकों येती । प्रेम नाहीं कोणां हातीं ॥२॥ तुका म्हणे सार । भक्ती नेणती गव्हार ॥३॥